यंदा मान्सून लांबणार का…?

कसा असेल पावसाचा मूड, काय असतील कारणे, जाणून घ्या…

 

देशात यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान मान्सून सरासरीत राहण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविलाय. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱया महाराष्ट्रासह देशाला दिलासा मिळालाय. असे असले, तरी मान्सूनचे आगमन मात्र लांबण्याची चिन्हे आहेत. स्वाभाविकच पाणीटंचाईने हैराण असलेल्या नागरिकांची धाकधूक वाढलीय. कसा असेल यंदाचा पाऊस, त्याचे आगमन वेळेवर होणार की विलंबाने आणि मोसमी पाऊस आणि त्याच्या इतर पैलूंचा घेतलेला हा आढावा.
नै त्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून हे भारतासारख्या देशाला मिळालेले वरदानच होय. मान्सूनवरच देशाचे, येथील शेतीचे भरण पोषण होते. इतकेच नव्हे, तर उद्योगधंद्यांपासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत सगळय़ाच महत्त्वाच्या घटकांवर पाऊसमान परिणाम करते. त्यामुळे मान्सूनवर शेतकऱयांपासून ते नोकरदारापर्यंत प्रत्येकाचेच लक्ष असते. सध्या देशाला तीव्र उन्हाळय़ाचे चटके सोसावे लागतायत. देशातील पाणीसाठाही 35 ते 40 टक्क्यांवर आलाय. महाराष्ट्रातील जलसाठाही 35 टक्क्यांखाली आलाय. त्यामुळे गावागावात, शहराशहरांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलीय. दुष्काळाचे हे सावट गडद होण्याची चिन्हे असतानाच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दीर्घकालीन अंदाज वर्तविलाय. देशात यंदा सरासरी 102 टक्के म्हणजेच 868.6 मिमी इतक्मया पावसाची शक्मयता या संस्थेने व्यक्त केलीय. यामध्ये 5 टक्के कमी-अधिकतेची शक्मयता गृहीत धरण्यात आलीय. परंतु, पाऊस चांगला पडणार, हे अधोरेखित करण्यात आलेय. ही खूषखबरच म्हणता येईल.
प्रशांत महासागरातील एल निनोचे आता ला निनोमध्ये रुपांतर होत आहे. ला निनोदरम्यान मान्सून चांगला राहिल्याचा इतिहास आहे. तसेच सुपर एल निनोनंतर ला निनो आल्यास मान्सून दमदार राहिला आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात एल निनोचा प्रभाव राहणार आहे. मात्र, दुसऱया टप्प्यात पाऊस जोरदार राहू शकतो. हिंदी महासागरातील इंडियन ओशन डाय पोलही सकारात्मक राहणार असून, त्यामुळेही मोसमी पावसाची स्थिती चांगली राहण्यास मदत होणार असल्याचे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी म्हटलेय.
अर्थात मान्सूनची सरासरी चांगली राहणार असली, तरी एल निनोचे ला निनोमध्ये रुपांतर होत असल्याने यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्मयता आहे. याशिवाय कमी कालावधीत जास्त पाऊस, पावसाचे असमान वितरण होण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱयांसह सर्वांची धाकधूक वाढलीय. मान्सून लांबण्याची शक्यता असल्याने पाण्याचे नियोजन कसे करायचे, हा प्रश्न आहे. आजमितीला अनेक भागांत दोन ते तीन महिने पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्याचे दिसते. धरणे, जलाशये आटत चाललीत. हे पाहता पाऊस लांबल्यास पाण्याचे नियोजन कसे करणार, याचे उत्तर शोधावे लागेल. त्याचबरोबर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने कसा वापर करता येईल, याकडेही लक्ष द्यावे लागेल.
देशाच्या दक्षिण, पश्चिम, उत्तर पश्चिम भागात चांगला पाऊस राहील. महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील पाऊस क्षेत्रात सरासरी इतका पाऊस राहील, तर बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगालमध्ये जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस कमी राहण्याची शक्मयता स्कायमेटने वर्तविलीय. तर पूर्वोत्तर भारतात जून व जुलैमध्ये पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय अतिरिक्त पाऊस 10 टक्के टक्के राहू शकतो. सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्मयता 20 टक्के आहे. सरासरी मान्सूनची शक्मयता 45 टक्के, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्मयता 15 टक्के, दुष्काळाची शक्मयता 10 टक्के आहे. तर जूनमध्ये सरासरीच्या 95 टक्के, जुलैमध्ये 105, ऑगस्टमध्ये 98 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 110 टक्के पावसाचा अंदाज आहे. पाऊस चांगला पडणार, हे शुभवर्तमानच म्हणता येईल. फक्त मान्सूनचे आगमन नेमके कधी होणार, याकडे सगळय़ांचेच डोळे असतील.

Share

Leave a Reply