पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
शाहूनगर चिंचवड मधील आर्यनम सोसायटीमध्ये एका फ्लॅटमध्ये आग लागली. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना सोमवारी (दि. 20) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली.
सोमवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला गुरुप्रसाद कनूजीअर यांनी शाहूनगर येथे आग लागल्याची वर्दी दिली. त्यानुसार चिखली उप केंद्राचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. आवश्यकतेनुसार पिंपरी अग्निशमन पथक, प्राधिकरण आणि तळवडे उप केंद्राच्या पथकांना बोलावण्यात आले. आर्यनम सोसायटी मध्ये दुसऱ्या मजल्यावर एका घरात आग लागली होती. त्यामुळे सोसायटी मध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. जवानांनी घरातून धूर बाहेर काढून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी किचन मध्ये दोन सिलेंडर होते. जवानांनी दोन्ही सिलेंडर सुरक्षित ठिकाणी हलवले. आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. एका तासात आग विझवण्यात जवानांना यश आले.
सब ऑफिसर बाळासाहेब वैद्य, गौतम इंगवले, लीडिंग फायरमन शहाजी कोपनर, विकास नाईक, संपत गौड, संजय महाडिक, चालक अमोल खंदारे, चालक दत्तात्रय रोकडे, फायरमन नवनाथ शिंदे, शाम खुडे, अनिल माने, ट्रेनी फायरमन विशाल चव्हाण, जगदीश पाटील, विनायक बोडरे यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.