एअर इंडियाच्या विमानाचा पुणे विमानतळावर अपघात

पुणे : टीम न्यू नेटवर्क

णे येथून दिल्लीकडे उड्डाण भरणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा पुणे विमानतळावर अपघात झाला. टग ट्रॅक्टरची आणि विमानाची धडक बसली. यामध्ये विमानाचे नुकसान झाले असून प्रवासी व विमानातील कर्मचारी सुखरूप आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 16) घडली.

एअर इंडियाचे विमान एआय 857 दिल्ली हुन पुणे विमानतळावर आले. 40 मिनिटांच्या विश्रांतीनंतर हे विमान एआय 858 सायंकाळी चार वाजता पुणे येथून दिल्लीकडे उड्डाण भरण्याच्या तयारीत होते. त्यावेळी विमानतळावर विमानाची आणि टग ट्रॅक्टरची धडक झाली. विमानतळावर टग ट्रॅक्टर सामानाची वाहतूक करणे तसेच विमानाला रनवे पर्यंत वळवून नेण्याचे काम करतात. या टग ट्रॅक्टरची विमानाला धडक बसल्याने विमानाचे नुकसान झाले.

या अपघातात विमानाचा पुढील भाग, लँडिंग गियर आणि एका टायरचे नुकसान झाले आहे. यावेळी विमानात 180 प्रवासी आणि विमानातील कर्मचारी होते. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Share

Leave a Reply