शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी
पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
बदलापूर येथील एका शाळेत चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद पिंपरी चिंचवड शहरातही उमटले. या घटनेने संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जोरदार निर्दशने करीत या घटनेचा निषेध केला.
चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. या घटनेची जबाबदारी स्वीकारुन गुहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनाम द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांना भयमुक्त वातावरणात श्वास घेण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. सरकारने
शिवसेना मावळ लोकसभा समन्वयक संजोग वाघेरे, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह युवा सेनेचे चेतन पवार, शिवसेनेचे योगेश बाबर, रोमी संधू तुषार नवले,अनंता कोऱ्हाळे, अमोल निकम, पांडुरंग पाटील, अनिल सोमवंशी, राजाराम कुदळे, गुलाब गरुड, युवराज कोकाटे, सतीश मरळ-देशमुख, विकास भिसे, प्रदीप महाजन, गोरख नवघणे, गोरख पाटील, गोविंद शिंदे, श्रीकांत चौधरी, गंगाधर काळे, शाम पवार, अमोल निकम, पांडुरंग पाटील, अनिल सोमवंशी, सागर शिंदे, बाळासाहेब जम, घनश्याम कुदळे, सचिन चिंचवडे, सुनील ठोकळ, भारत इंगळे, राम उत्तेकर, नाथाभाऊ खांडेभराड, राजू निकम आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.