खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास भोसरीकरांचा उदंड प्रतिसाद -अजित गव्हाणे यांचा पुढाकार, युवकांचा उस्फुर्त सहभाग

भोसरी, टीम न्यू महाराष्ट्र :

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल  कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास तमाम भोसरीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यागाचे अनोखे उदाहरण प्रस्थापित केले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या पुढाकारातून भोसरी विधानसभेत रक्तदानाचा हा यज्ञकुंड धगधगला .

भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेहरूनगर, दिघी, रुपीनगर, ताम्हणे वस्ती,  घरकुल वसाहत,  इंद्रायणी नगर नेहरूनगर आदी भागांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी पार पडलेल्या शिबिरासाठी माजी महापौर हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक पंकज भालेकर,संजय वाबळे, प्रवीण भालेकर, विनायक रणसुभे , प्रियंका बारसे, माजी शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर , शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्षा ज्योती  निंबाळकर, युवक अध्यक्ष इम्रान शेख, शरद ताम्हाणे, सागर तापकीर, शरद भालेकर, रवींद्र सोनवणे  यांनी पुढाकार घेतला.

तळवडे भागामध्ये झालेल्या रक्तदान शिबिरासाठी माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी पुढाकार घेतला होता. माजी नगरसेवक प्रवीण भालेकर,  रवींद्र आप्पा सोनवणे, माजी शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, शरद भालेकर, अरुण पवार, पंढरी गरुड, अरुण थोपटे श्रीनिवास बिराजदार, कल्पेश गोरड आदी उपस्थित होते.

इंद्रायणीनगर येथे माजी नगरसेवक संजय वाबळे यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उद्योग व्यापार सेल शहराध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे,नाना नानी पार्क मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रासकर , माणिक जैद, सुदाम शिंदे, दत्तात्रय दिवटे,  चंद्रकांत नाणेकर , अशोक मोरे आदी उपस्थित होते.

नेहरूनगर येथे माजी विरोधी पक्ष नेते राहुल भोसले यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या रक्तदान शिबिरामध्ये युवकांची हजेरी मोठ्या प्रमाणात होती.   यावेळी माजी महापौर हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर तसेच सतीश भोसले, अमित भोसले ,रामा नलावडे ,संतोष लष्करे, जयंत शिंदे , करण बरई, संजय घाडगे, अनिल यादव आदी उपस्थित होते.

दिघी येथील ऍक्टिव्ह आईज चॅरिटेबल ट्रस्ट आणि युवक शहर सचिव प्रशांत विवेकानंद काळेल यांच्या पुढाकारातून उस्फुर्त अशा प्रतिसादात रक्तदान शिबीर पार पडले. माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, प्रतिभा दोरकर, ज्ञानेश आल्हाट, पुंडलिक सैंदाणे, रमेश सायकर, वसंत इंगळे, धनंजय खाडे, समाधान कांबळे, अमोल देवकर, वसीम शेख, नैनील रुणवाल, सुरज बोराटे, गणेश हजारे, हरिभाऊ लबडे, रवी चव्हाण, संतोष  घोलप, मंगेश असवले, गौरव सावंत, सोनल चोंधे, सोमेश  केसभट, सुरज  खंडारे आदी उपस्थित होते.
—————————

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने बोलताना अजित गव्हाणे म्हणाले डेंगू आणि चिकनगुनियाची साथ शहरात खूप मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आज रक्ताचा आणि पांढऱ्या पेशींचा तुटवडा आहे. जास्तीत जास्त संख्येने होणारे रक्तदान हे अनेक रुग्णांना जीवनदान देणार आहे. आज या रक्तदान शिबिरात सहभागी प्रत्येकाबद्दल कृतज्ञता म्हणून सर्व रक्तदात्यांना प्रत्येकी पाच लाखाचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच, प्रत्येक रक्तदात्यास आजीवन मोफत रक्त व त्यांच्या नातेवाईकास एक वर्ष रक्त मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापुढेही उपक्रमांना भोसरीकरांचा असाच प्रतिसाद मिळेल हा मला विश्वास आहे.

अजित गव्हाणे
माजी अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

Share

Leave a Reply