चिंचवडमध्ये झाड पडले; कारचे मोठे नुकसान

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

कारवर झाड पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (दि. 1) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास बीएसएनएल चिंचवड येथे घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीएसएनएल चिंचवड येथे रस्त्याच्या बाजूला असलेले जंगली झाड बुधवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास पडले. हे झाड एका कार (एमएच 04/डीजे 9268) वर पडले. त्यात कारचे छत, हेडलाईट, पुढचे दरवाजे, केबिन, संपूर्ण काचा फुटून मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच प्राधिकरण उप-अग्निशमन केंद्रातून उप अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, संपत गौंड, प्रमुख अग्निशामक विमोचक संजय महाडिक, वाहन चालक अमोल रांजणे, अग्निशामक विमोचक अनिल माने, ट्रेनि सब ऑफिसर शुभम पिंपळे, ट्रेनि फायरमन तेजस पवार, सौरभ घोरपडे यांनी घटनास्थळीत धाव घेतली.मुख्य अग्निशामक विमोचक संजय महाडिक यांनी इलेक्ट्रिक चेन सॉने झाड कापून गाडी बाजूला केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

Share

Leave a Reply