चिखलीतील माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण; समाविष्ट गावांमध्ये संतापाची तीव्र लाट

– ग्रामस्थांची भावना; गुंडगिरी, दडपशाहीमुळे भोसरी मतदारसंघात भाजप आमदारांचा पराभव अटळ

-तक्रार केली म्हणून मारहाण करता, आता परिवर्तन अटळ

नागरिक म्हणाले; आमच्या संघर्षाला अजित गव्हाणे यांचा चेहरा मिळाला-

-दडपशाही जुगारून भोसरी विधानसभेतील नागरिक परिवर्तन करणार

भोसरी 16 नोव्हेंबर:

चिखलीमध्ये भाजपच्या आमदार समर्थकांनी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण केली. हिमनगाचे हे टोक असून आत्ता कुठे यावर तक्रार दाखल झाली. गेली दहा वर्षे हेच प्रकार सातत्याने होत आहेत. मात्र दहशत, दडपशाहीमुळे यांच्या विरोधात बोलायला कोणी पुढे आले नाही. आम्ही परिवर्तनाचा संघर्ष सुरू केला असून या लढ्याला खऱ्या अर्थाने बळ मिळत आहे. त्यातूनच नागरिक पुढे येत आहेत. परिवर्तनाचा हा संघर्ष येथील सत्ता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही अशा भावना चिखली, मोशी, चऱ्होलीतील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

प्लॉटिंगबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणकडे (एनजीटी) दिलेली तक्रार मागे घ्या, असे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांच्या मित्रालाही मारहाण करीत अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती आणि भाजपच्या माजी स्वीकृत सदस्यासह अकरा जणांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली. मारहाण करणारे भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामध्ये भाजपचे माजी प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश लालचंद यादव, भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव यांचे पती संतोष जाधव यांच्यासह नीलेश लालचंद यादव, गणेश किसन यादव, दीपक घन, गणेश नंदू मोरे, सोमनाथ यादव, स्वराज पिंजण, प्रकाश चौधरी, मनोज मोरे, कुंदन गुप्ता अशा लोकांचा समावेश आहे.

या घटनेनंतर समाविष्ट गावातील नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. गेली दहा वर्ष हीच दडपशाही आणि गुंडगिरी भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने सुरू आहे. जमिनींसाठी या भागात सत्ताधारी ग्रामस्थांच्या ,शेतकऱ्यांच्या अक्षरशः जीवावर उठले आहेत. त्यामुळेच या मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची लढाई आम्ही भूमिपुत्रांनी सुरू केली. चिखली मध्ये घडलेला प्रकार हा हिमनगाचे एक टोक आहे. मोशी, चऱ्होली भागात भाजप आमदारांचे समर्थक ताबा गँग म्हणून प्रसिद्ध आहेत. यांनी आमच्या जमिनी लाटल्या. महापालिकेच्या आरक्षणांची भीती दाखवत कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या. या भागात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पामध्ये यांची भागीदारी दिल्याशिवाय काम होऊ दिले नाही. रस्त्यांसाठी अडवणूक केली. मात्र कोणत्याही मर्यादा सोडून केलेल्या गोष्टीला अंत असतो. भाजप आमदारांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या गुंडशाहीचा अंत करण्यासाठी या भागातील नागरिकांनीच आता पुढाकार घेतला आहे अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

Share

Leave a Reply