मोझे इंजिनिअरिंग काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी साधला इस्रोतील शास्त्रज्ञांशी थेट संवाद

भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र 

वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग काॅलेजच्या वतीने   विद्यार्थ्यांसाठी बंगळुरु येथील इस्रोच्या यू. आर. राव सॅटेलाईट सेंटरन येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी इस्रोतील शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधून  तांत्रिक ज्ञान व अनुभव प्राप्त केला.

ही औद्योगिक भेट काॅलेजचे अध्यक्ष  रामभाऊ मोझे यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या भेटीदरम्यान सॅटेलाईट निर्मिती प्रक्रिया, प्रक्षेपण तंत्रज्ञान व भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती घेतली. विशेषतः विद्यार्थ्यांना गगनयान मोहिमेबाबत माहिती देण्यात आली. ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठविण्याचे लक्ष्य आहे.

इस्रोतील शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधून विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान व अनुभव प्राप्त केला. या औद्योगिक भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञान, संशोधन व विकास प्रक्रिया याबद्दल प्रत्यक्ष माहिती देणे तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांसाठी ही भेट प्रेरणादायी ठरली असून भविष्यातील करिअरसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास कॉलेज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Share

Leave a Reply