पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शाहुनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आयुक्तसाहेब प्राणी संग्रहालय कधी सुरू करणार? असा सवाल नागरिक करत आहेत.
शहरातील एकमेव प्राणी संग्रहालय संभाजीनगर या ठिकाणी आहे. दुरुस्तीसाठी बंद आहे. वाघ, सिंह, हत्ती, मगर, अस्वले शहामृग, हरीण इत्यादी मोठे प्राणी कात्रज येथील प्राणी संग्रहालयात हलविण्यात आले आहे. येथे साप, माकडे, कासव, मोर असे छोटे पक्षी ठेवण्यात आले आहेत. प्राणी संग्रहालय गेल्या चार वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची हिरमोड झाला. आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब दखल घेऊन प्राणी संग्रहालय सुरू करावे. उन्हाळ्यात प्राणी संग्रहालयात साप, माकडे, कासवं, मोर असे छोटे पक्षी मरण पावले असून त्यांना उन्हाचा तडाखा सहन होत नाही. यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे