चिखली ः न्यू महाराष्ट्र टीम
चिखली, मोरेवस्ती येथील हिरा सामाजिक शिक्षण संस्था संचलित सिद्धिविनायक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये एक घास फाउंडेशन आणि आयआयबी करिअर इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात इयत्ता १० वी आणि १२ वीनंतरच्या करियर वाटा याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोणते करिअर निवडावे व त्यासाठी कशा पद्धतीने तयारी करावी याचे मोलाचे मार्गदर्शन देसाई सर आणि सचिन सर यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी करिअर विषयीचे विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. कार्यक्रमाला शाळेच्या संस्थापिका निर्मला जाधव, सेक्रेटरी मारुती जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन शिल्पा दांडगे आणि पल्लवी जाधव यांनी केले. आभार पिंकी चौधरी यांनी यांनी मानले.