पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
श्री. दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशनच्या वतीने चंद्रभागा कॉर्नर, रावेत येथे आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव उत्साहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी गायन स्पर्धा, लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा, मिसेस रावेत अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या स्पर्धकांनी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या उत्सवात मोठ्या प्रमाणात देवी भक्तांनी व दांडिया गरबा प्रेमींनी दांडिया-गरबा खेळण्याचा आनंद घेतला. दांडिया खेळण्यासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. स्पर्धेतील विजेत्यांना व स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण सुंदर व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते.या प्रसंगी भाजप शहाराध्यक्ष शंकर जगताप, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी गटनेते नामदेव ढाके , भाजप मंडलाध्यक्ष सोमनाथ भोंडवे, यांच्यासह सुरेश भोंडवे, संतोष भोंडवे आदी उपस्थित होते. उत्सवादरम्यान दांडिया-गरबा प्रेमींनी दिपक मधुकर भोंडवे व त्यांच्या नियोजनाचे कौतुक केले.