मावळ : टीम न्यू महाराष्ट्र
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (गुरुवार) पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होत असून दि.18 एप्रिल रोजी निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक कार्यालय 7 वा मजला, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी या ठिकाणी ही नामनिर्देशन पत्रे स्विकृत केली जातील. दि.25 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिनांक असेल. दि.26 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छानणी केली जाईल तर दि.29 एप्रिल हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक असेल. दि.13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दि.4 जून रोजी मतमोजणी प्रक्रीया पार पडेल. महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे हे सोमवारी तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे हे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.