पतित पावन संघटनेकडून बदलापूर प्रकरणातील नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

पुणे ः टीम न्यू महाराष्ट्र

 बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काउंटर करा तसेच या प्रकरणी पालकांची तक्रार घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी सुमारे ११ तास टाळाटाळ केली. या गंभीर गुन्ह्याकडे दुर्लक्ष  करणाऱ्या जबाबदार पोलिस अधिकारी कमर्काचाऱ्यांना कामचे घरी बसवा या मागणीसाठी पतित पावन संघटनेच्या वतीने बालगंधर्व चौक येथे आंदोलन करण्यात आले .

या वेळी संतत्प आंदोलकांनी  चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली. त्यानंतर त्याचे दहनही करण्यात आले. पतित पावन संघटनेचे  प्रदेश संपर्कप्रमुख  राजेश मोटे,  पुणे शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर,  शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार,  जिल्हाध्यक्ष सुनील मराठे, जिल्हा सरचिटणीस माउली साठे,  शहर सरचिटणीस मनोज पवार, उपाध्यक्ष पप्पु टेमघरे, संघटक विजय गावडे, संघटक रमेश गाढवे, चिटणीस राजाभाऊ बर्गे,  ज्ञानेश्वर हराळे पाटील, शंकर बरके, राजू नायर, सौरभ कुलकर्णी, शुभम परदेशी, अक्षय बर्गे, अनिकेत बांदल, दीपक परदेशी, विकास पाटणे, शौनक कटिकर, राजाभाऊ गायकवाड, नाझिर शेख, नरेंद्र गुप्ता, विनोद बागल, शशिकांत तोडकर, कुणाल घोलप, सौरभ पवार, अक्षय राऊत, सनी शेलार, तन्मय बरके आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply