अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार

वाॅश्गिंटन ः टीम न्यू महाराष्ट्र

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार झाला असून हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. या हल्ल्यात जखमी झालेल्या ट्रम्प यांना  तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या गोळाबाराच्या घटनेचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निषेध केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारात  ट्रम्प समर्थकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरालाही ठार करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ट्रम्प आणि बायडन दोघेही निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. एका प्रचार रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी  या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसेला कोणतीही जागा नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

Share

Leave a Reply