पुण्याहून सुटणार उन्हाळी विशेष रेल्व

पुणे – उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाने उन्हाळी विशेष रेल्वे (Summer Special Train) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते दानापूर, पुणे ते हजरत निजामुद्दीन आणि पुणे ते नागपूर येथे या उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.

पुणे – दानापूर – पुणे

पुणे – दानापूर सुपरफास्ट द्वीसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस (गाडी क्रमांक 01471) 11, 14 एप्रिल, 2 आणि 5 मे रोजी पुण्याहून सकाळी 6.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता दानापूरला पोहोचेल.

दानापूर – पुणे सुपरफास्ट द्वि साप्ताहिक विशेष एक्सप्रेस (गाडी क्रमांक 01472) 12, 15 एप्रिल, 3 आणि 6 मे रोजी दानापूर येथून दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7.45 वाजता पुण्याला पोहोचेल.

ही गाडी हडपसर, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा येथे थांबेल.

पुणे – नागपूर – पुणे

पुणे – नागपूर सुपरफास्ट द्वी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस (गाडी क्रमांक 01166) 14 एप्रिल ते 16 जून (19 ट्रिप) दरम्यान दर मंगळवार आणि रविवारी पुण्याहून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल.

नागपूर – पुणे सुपरफास्ट द्वि साप्ताहिक विशेष एक्सप्रेस (गाडी क्रमांक 01165) 13 एप्रिल ते 15 जून दरम्यान (19 ट्रिप) दर सोमवार आणि शनिवारी नागपूरहून सायंकाळी 7.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.25 वाजता पुण्याला पोहोचेल.

ही गाडी उरुळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.

पुणे – हज़रत निजामुद्दीन – पुणे

पुणे – हज़रत निज़ामुद्दीन साप्ताहिक सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस (गाडी क्रमांक 01491) 12 एप्रिल ते 28 जून दरम्यान (12 ट्रिप) दर शुक्रवारी पुण्याहून सायंकाळी 5.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.45 वाजता हज़रत निज़ामुद्दीनला पोहोचेल.

हज़रत निज़ामुद्दीन – पुणे साप्ताहिक सुपर फास्ट विशेष एक्दिसप्नांरेस (गाडी क्रमांक 01492) 13 एप्रिल ते 29 जून दरम्यान (12 ट्रिप) दर शनिवारी हज़रत निज़ामुद्दीन येथून रात्री 10.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11.55 वाजता पुण्याला पोहोचेल.

ही गाडी लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम, भवानीमंडी, कोटा, सवाई माधोपुर आणि मथुरा येथे थांबेल

Share

Leave a Reply