चाकण एमआयडीसी पसिरात 40 हजार घरांचा वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड

  • चाकणमहापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही अतिउच्चदाब लोणीकंद उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे चाकण एमआयडीसीमधील महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या ३४ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील बंद पडला. त्यामुळे चाकण एमआयडीसी व परिसरातील सुमारे ४० हजार ३०० घऱगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी सकाळी साडेनऊ ते सव्वा दहा वाजेपर्यंत बंद राहिला.

याबाबत महिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून चाकण एमआयडीसीमधील चाकण ४०० केव्ही, चाकण फेज दोन २२० केव्ही व ब्रीजस्टोन २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जातो. मात्र आज सकाळी ९.३१ लोणीकंद उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे सुमारे १८१ मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली.

त्यामुळे भार व्यवस्थापनासाठी एलटीएस यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसीमधील महापारेषणच्या तीनही अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी या उपकेंद्रांतून महावितरणच्या ३४ वीजवाहिन्यांचा देखील वीजपुरवठा खंडित झाला. चाकण एमआयडीसी व परिसरातील शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, संगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोरी, सारा सिटी, कुरुळी, नाणेकरवाडी, आळंदी फाटा, चिंबोली, निघोजे, मोई आदी गावांतील ८०० उच्चदाब व ५५०० लघुदाब औद्योगिक ग्राहक तसेच सुमारे घरगुती व वाणिज्यिक ४० हजार ३०० ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत बंद राहिला.

Share

Leave a Reply