मुंबई ः टीम न्यू महाराष्ट्र
घरांना किंवा इमारतींना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. शॉर्ट सर्किट हे आग लागण्याचे प्रमुख कारण ठरते. घरातील एसी, फ्रीज यासारख्या उपकरकणांवर अतिरिक्त दबाव पडल्याने शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. तो टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कशामुळे होते शॉर्ट सर्किट
शॉर्ट सर्किट अत्यंत धोकादायक असून यामुळे आग लागण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक उपकरणांचे मोठे नुकसान होते. उच्च दाबाच्या उपकरणांमुळे दबाव वाढतो आणि विजेचा प्रवाह बिघडतो. त्यामुळे विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होतो.
वायरिंग योग्य नसेल किंवा खराब वायरिंगमुळे इन्सुलेशन तुटते आणि शॉर्ट सर्किट होते. शॉर्ट सर्किटची अनेक कारणे असू शकतात. अनेक घरांमध्ये सर्किट ब्रेकर असतात जे शॉर्ट सर्किटनंतर ट्रिप होतात. सर्किट ब्रेकर वारंवार ट्रिप होत असेल तर तातडीने घरात तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.
शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी नमके करायचे काय
शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी घरातील वापरात नसलेली उपकरणे अनप्लग करावीत.
फ्यूज करंट प्रवाह योग्य नियंत्रित करतो आणि शॉर्ट सर्किटपासून टाळतो. त्यामुळे क्वालिटी फ्यूजचा वापर करावा.
इन्सुलेशनमधील खराबीमुळे देखील शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे घरातील विजेच्या तारा एक्सपोज्ड, जुन्या होऊ नये आणि इन्सुलेशन योग्य आहे का हे वेळोवेळी तपासून पाहा.
पाणी किंवा अधिक उष्णतेमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे घरातील विजेची उपकरणे उष्णतेपासून दूर ठेवावी आणि त्यांच्या आजूबाजूची जागा सुकी ठेवावी.
घरात विजेच पॉईंट कमी असल्यास अनेकदा एकाच आऊटलेट किंवा सॉकेटमध्ये अनेक प्लग लावले जातात. ज्यामुळे सॉकेटवर लोड येतो आणि शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. त्यामुळे एकाच सॉकेटमध्ये अनेक उपकरणांचे प्लग लावणे टाळा.
घरातील उपकरणांच्या वायर वेळोवेळी चेक करा. एखाद्या उपकारणाची वायर योग्य नसेल तर ती बदला. घरातील विजेचे सर्किट वेळोवेळी तपासा आणि त्याची दुरुस्ती करा.