बाळासाहेब ओव्हाळ यांनी छट पूजे निमित्त घेतली उत्तर भारतीय बांधवांची भेट, उत्तर भारतीय बांधवांनी पाठीशी राहण्याचा दिला शब्द

पिंपरी : दापोडी येथील पवना नदी घाटावर उत्तर भारतीय छठ पूजा समिती आयोजित उत्तर भारतीयांचा दोन दिवसीय छठपूजा उत्सव दिमाखात साजरा झाला.यानिमित्ताने पिंपरी विधानसभेचे परिवर्तन महाशक्तीचे म्हणजेच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी घाटावर उत्तर भारतीय बांधवांची भेट घेऊन संवाद साधला.यावेळी पिंपरी मतदार संघातील उत्तर भारतीय बांधवांनी पाठीशी राहण्याचा बाळासाहेब ओव्हाळ यांना अश्वासीत केले.

छट पूजे निमित्त भेट घेणारे ओव्हाळ एकमेव उमेदवार
एकीकडे सर्वत्र विधानसभेचे रणसंग्राम सुरू असताना आमच्या साठी छट पूजा हा महत्वाचा सण असताना केवळ तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल बाळासाहेब ओव्हाळ यांचे आभार मानताना अनेक उत्तर भारतीय बांधव भारावून गेले होते.
पहाटे पाच वाजता घाटावर सुरू झालेल्या भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.

निवडणूक जनजागृती
भाविकांच्या ” जय छठमाता ” च्या गजराने वातावरण प्रसन्न झाले होते. यावेळी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील भाविकांना मतदान करण्याची शपथ दिली आणि निवडणूक जनजागृती केली.

मोठ्या संख्येने भाविक उपस्थित
या उत्सवात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय कुटुंबांनी गुरुवारी (दि. ७) रोजी भक्तिभावाने सुर्योपासना केली. तसेच अखेरच्या दिवशी शुक्रवारी (दि. ८) रोजी सकाळी पवनामाईच्या पाण्यात उभे राहून सूर्यदेव बाहेर येण्याची पूर्ण भक्तिभावाने वाट पहिली. सूर्योदय झाल्यावर छठ मैयाचा जप करून सूर्याला अर्घ्य दिले. शेवटी दूध पिऊन व प्रसाद खाऊन आपला उपवास सोडला.

उत्तर भारतीय महिला सूर्याची उपासना म्हणून छटपुजेचे व्रत

भाविकांनी गुरुवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदरच छटमाईची पूजा मांडत तिथे विधिवत पूजा केली होती. या मांडणीमध्ये चारही बाजूने ऊस पुळणीत रोवून उसाचा मांडव करून त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेऊन त्यावर दिवा पेटवला. त्यावर विटाची मांडणी करून पूजेची मांडणी केली होती. त्यासमोर खवा, गव्हाचं पीठ आणि तुपापासून बनवलेला प्रसाद आणि फळं यांचा नैवेद्य दाखविण्यात आला होता. सूर्याचा अस्त होताना महिलांनी गाईच्या दुधाचे अर्घ्य दिले होते.
आपल्या कुटूंबाला सुख, समृध्दी, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे यासाठी उत्तर भारतीय महिला सूर्याची उपासना म्हणून छटपुजेचे व्रत करतात. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत असल्याची प्राचिन काळापासूनची श्रध्दा असल्याचा अनुभव येथील भाविकांनी सांगितला.

Share

Leave a Reply