चिचवड- श्री स्वामी प्रकट दिनानिमित्त चिंचवड गाव येथे बुधवारी (दि.10) सोहळा रंगणार आहे. धनेश्वर मंदिरा जवळील रामतिर्थ अपार्टमेंट येथे सकाळपासून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये पुजा, आरती, महाप्रसाद अशा कार्यक्रमात भाविकांना सहभागी होता येणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनीया कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे निमंत्रण श्री स्वामी भक्त जमखंडी परीवार यांनी केले आहे.