मुंबईत रविवारी लोकलचा खोळंबा!”या” मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई :टीम न्यू महाराष्ट्र

मुंबईत उद्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे उद्या घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे लागणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उद्या सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल या सीएसएमटी व विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर धिम्या मार्गावरील गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाड्या डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल या विद्याविहार व सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल गाड्यांणा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबणार आहे.

या लोकल बंद राहतील
सीएसएमटीसाठी / वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ दरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. तर सीएसएमटीसाठी सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे गोरेगाव डाऊन हार्बर मार्गावरील लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत.

ब्लॉक काळात सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी विभागांदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. तर या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी नेरुळ स्थानकावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे

Share

Leave a Reply