पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
चिखली, मोरे वस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कुल अॅंड ज्युनिअर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यालयाच्या आवारात योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली.
या वेळी शाळेच्या संस्थापक अध्यक्षा निर्मला जाधाव, सचिव मारुती जाधव, प्राचार्या अश्विनी वाघ यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी पद्मासन, वज्रासन, हलासन, शिर्षासन, शवासन, त्रिकोणासन, धनुरासन, ताडासन, अनुलोम विलोम, वृक्षासन, भुजंगासन, सूर्यनमस्कार अशी विविध प्रकारची योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. उत्तम आरोग्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी नियमितपणे व्यायाम, प्राणायाम व योगासने करावीत असे आवाहन शाळेच्या संस्थापक अध्यक्षा निर्मला जाधव यांनी केले.