मुंबई ः टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठ काँक्रीटीकरण थांबवून पूर रोखण्यासाठी आणि नद्या स्वच्छ करण्यासाठी पुणे-पीसीएमसी रिव्हर रिव्हायवल या नदी बचावसाठी झटणाऱ्या संघटनेच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर या शिष्टमंडळाच्या मागण्यांची गंभीर दखल घेत राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव विकास खारगे यांना राज्याच्या जलसंपदा विभाग आणि पिंपरी चिंचवड आयुक्तांसोबत त्वरित बैठक घेऊन नदी काँक्रीटीकरण आणि पूर परिस्थिती समजावून घेऊन त्वरित कारवाईचे निर्देश दिले.
पिंपरी चिंचवड शहरातील चार सदस्यांच्या शिष्टमंडळाने शहरातील 46 विविध क्षेत्रातील संस्थांच्यावतीने मुळा नदीवर सुरू असलेले काँक्रीटीकरण थांबवावे. तसेच फक्त मुळा नदी नव्हे तर पवना आणि इंद्रायणी नद्यासुद्धा उगम ते संगम स्वच्छ करण्याच्या मागणीचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या विशेष प्रयत्नातून या शिष्टमंडळाची आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भट घडली. या शिष्टमंडळात नरेंद्र चुघ, बाबा भोईर, तुषार शिंदे, धनंजय शेडबाळे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
नदीपात्र ३८ टक्के अरुंद होणार आहे, CWPRS आणि प्रकल्प सल्लागार कंपनीने पुराची जबाबदारी झटकली असल्याची गंभीर बाबही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. असे असतानाही महापालिका हा प्रकल्प रेटत असल्याकडेही त्यांनी मुख्यंमंत्र्यांचे लक्ष वेधले.
दरम्यान, शिष्टंमंडळाच्या या मुद्यांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणीवस यांनी राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव विकास खारगे यांना राज्याच्या जलसंपदा विभाग आणि पिंपरी चिंचवड आयुक्त यांच्याशी त्वरित बैठक घेऊन नदी काँक्रीटीकरण आणि पूर परिस्थिती समजावून घेऊन त्वरित कारवाईचे निर्देश दिले.