पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील लाल महालापासून निघालेल्या युवा आक्रोश यात्रेचे देहूरोड शहरात देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी युवकांच्या विविध मागण्यांचे निवेदन युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना देण्यात आले. युवकांना स्थाानिक एमआयडीसीत तसेच महापालिकेत शैक्षणिक पात्रतेनुसार प्राधान्याने नोकऱ्या मिळाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सवाना हॉटेल चौकापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत मोठ्या जल्लोषात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच ऐतिहासीक धम्मभूमी येथील तथागत भगवान गौतम बुद्ध प्रतिमेस पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक हाजीमलंग काशिनाथ मारिमुत्तू, मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, मावळ तालुका कार्याध्यक्ष गोपाळ तंतरपाळे, मावळ तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूरभाई शेख, मावळ तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले, देहूरोड ब्लॉक किसान सेलचे-अध्यक्ष संभाजी पिंजण, पर्यावरण अध्यक्ष आकाश राजलिगम, व्यंकटेश रामनारायन, सचिव- गोपाल राव, सहसचिव बबन टोम्पे, युवा नेते मालिक शेख, जावेद शिकलकर, रईस शेख, अर्चना राऊत, निलेश बोडके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.