एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट आयोजित एचआर कॉनक्लेव्हला प्रतिसाद

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

– पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट पुणे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सेनिल मॅनेजमेन्ट (एनआयपीएम) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डायव्हर्सिटी हार्मोनी क्राफ्टिंग एन इनक्लुजिव्ह फ्युचर’ विषयावर एचआर कॉनक्लेव आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एनआयपीएम पुणे चॅप्टरचे चेअरमन कल्याण पवार, सचिव अजित ठाकूर आणि डॉ. अभय कुलकर्णी, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवडकर आदी उपस्थित होते.
डॉ. वहिदा पठाण (मॉडरेटर, एनआयपीएम, पुणे चॅप्टर), डॉ. मीनल राव (ग्रुप हेड एचआर, इंडस्ट्रिअल प्रोडक्ट्स बिझनेस, थर्मेक्स लिमिटेड), डॉ. ईला पाठक-झा (डायरेक्टर, स्टुडंड वेलफेयर, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे), ओजस्विनी सपाटणीकर (हेड, पीपल स्ट्रॅटर्जी, इन्टॅनगल्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड), रिनत मॉस्कोविच (व्हाईस प्रेसिडेंट, बीव्हीजी इंडिया लिमिटेड), तनिंदर कौर (ओडी ट्रेनर) आणि शितल इंगळे (एचआर डायरेक्टर, फाइव्ह डी सोल्युशन्स) यांनी पॅनेल डिस्कशन दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविधतेचे महत्त्व आणि प्रत्येक व्यक्तीला कंपनीमध्ये कशी वागणूक दिली पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा. डॉ. इरम अन्सारी यांच्या सह विद्यार्थी प्रतिनिधी मयूर मराठे, अनुराधा कांबळे, रक्षंदा कुनघाडकर, आकांक्षा चव्हाण, प्रिन्स शहारे, सेलिना सजी, आदित्य उत्तेकर, अनिरुद्ध पाटसकर, पूर्णिमा हंगर्गे, साक्षी गाडेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजनंदिनी सावळकर हिने केले.

Share

Leave a Reply