पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
हिरा सामाजिक शिक्षण संस्था संचलित सिद्धिविनायक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज
इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष निर्मला जाधव यांनी दिली.
या विद्यालयातील विज्ञान व वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी वाणिज्य शाखेचे सर्व विद्यार्थी 70 टक्क्यांच्या पुढे व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ ‘अ’श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतील प्रथम क्रमांक आकांक्षा जगताप, द्वितीय क्रमांक पायल मारुती जाधव व तृतीय क्रमांक ओम माने यांनी मिळवला. सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्ष निर्मला जाधव, सचिव मारुती जाधव वप्राचार्य अश्विनी वाघ यांनी अभिनंदन केले . वाणिज्य व विज्ञान दोन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला.
सविस्तर निकाल
विज्ञान शाखा
आकांक्षा जगताप 87. 50%
पायल मारुती जाधव 83%
ओम माने 81.83%
वाणिज्य शाखा
कुरकुटे श्रुतिका 71.83%
कांबळे आदित्य 62.67%
जाधव मयुरी 60.50%