तळजाई टेकडीवर रवींद्र धंगेकर, सुनेत्रा पवार यांनी साधला संवाद

पुणे : दक्षिण पुण्याच्या सौंदर्याचा मुकुट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडी परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला.
शुध्द हवा,चालण्यासाठी मातीची नैसर्गिक पायवाट, चारही बाजूला घनदाट झाडे, पक्षांची किलबिलाट या सर्व वातावरणात तळजाई टेकडी वर्षाचे बारा महिने दक्षिण पुण्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असते. तळजाई टेकडीच्या संवर्धनासाठी तिच्या अधिकाधिक वृक्षारोपण, अधिकाधिक पानवठे तयार करणे, नागरिकांना चांगल्या पिण्याच्या पाण्याची सोय, चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे, दिशादर्शक फलक, लाईटची सोय, नियमित साफसफाई करणारी स्वयंभू यंत्रणा या सर्व गोष्टी होणे गरजेचे आहे. निश्चितच तळजाई टेकडी संवर्धनासाठी यापुढील काळात सर्वसमावेशक काम करण्याचा माझा मानस राहील, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.मॉर्निंग वॉक दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रावहिनींची देखील या ठिकाणी भेट झाली. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते, असेही धंगेकर म्हणाले.

Share

Leave a Reply