भोसरी, टीम न्यू महाराष्ट्र
गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या वडमुखवाडी येथील श्री. सयाजीनाथ महाराज विद्यालयाने ‘समूह गायन स्पर्धेत ‘तसेच ‘भारत को जानो’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत
घवघवीत यश संपादन केले.
भारत विकास परिषद पुणे पूर्व यांच्या विद्यमाने या स्पर्धा ‘सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूल ,विमान नगर ‘ या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे तसेच ‘भारत को जानो ‘ या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विद्यालयातील अमर नरवटे व अभिजीत दोडके या दोघांना उत्तेजनार्थ क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एकूण 20 शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत आपले यश खेचून आणले आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ मोझे ,शालेय समिती अध्यक्षा प्राध्यापिका अलका पाटील ,संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे तसेच विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक भाऊसाहेब जाधव व अर्चना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.