चिंचवडमध्ये भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

चिंचवड , टीम न्यू महाराष्ट्र

उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला चिंचवडकरांकडून भावपूर्ण निरोप देण्यात आला .

मंगळवारी दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली. चिंचवड, चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले.

आनंदनगर मित्र मंडळाने कोल्हापूरच्या अंबाबाईचा रथ साकारला होता. बालवारकरी,संबळवादक सहभागी झाले होते.
श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या मिरवणुकीत आरंभ ढोल ताशा पथक , बालवारकरी सहभागी झाले होते. त्यांनी विठ्ठलाचा रथ साकारला होता. तरुण मित्र मंडळाने भंडाऱ्याची उधळण करत पालखीतून मिरवणूक काढली. गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या मिरवणुकीत शिवदर्शन ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. श्रीराम मोरया दरबार देखाव्याचा चित्ररथ साकारला होता. मुंजोबा मित्र मंडळाने शिवपार्वती रथ साकारला होता. काळभैरवनाथ मित्र मंडळाने ‘रामरथ’ साकारला आहे. ज्ञाप्रबोधिनीच्या 200 मुलांच्या ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. समर्थ मित्र मंडळाने फुलांची उधळण करत गणरायाला निरोप दिला. समर्थ मित्र मंडळाने फुलांची उधळण करत गणरायाला निरोप दिला. भोई आळीतील उत्कृष्ट तरूण मंडळाने ‘भक्तीरथ’ साकारला होता.

Share

Leave a Reply