पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता लष्कर वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशानुसार महात्मा गांधी रस्ता, कॅम्प येथील वाय जंक्शन ते ट्रायलक हॉटेल चौकापर्यंत रस्त्याच्या पूर्व तसेच पश्चिम दिशा नो पार्किंग, वाय जंक्शन ते १५ ऑगस्ट चौकापर्यंत रस्त्याच्या पूर्व बाजूस नो पार्किंग, रस्त्याच्या पश्चिम बाजूस सिरीयल माता मेढी मंदीर ते १७४, रेडीएंट स्पॉट व शॉप नं.१ पर्यंत दुचाकी पार्किंग, १७४, रेडीएंट स्पॉट, शॉप नंबर १ पासून पुढे १८२ व जय अम्बे मोटर्स या दुकानापर्यंत चारचाकी वाहनांसाठी ॲग्युलर पार्कीग करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट चौक ते महमंद रफी चौकापर्यंत रस्त्याच्या पूर्व बाजुस १४०, महात्मा गांधी रस्त्यावरील हेमा फ्लोवर्स दुकान ते ९५, प्लेटेनियम लायटनिंग या दुकानापर्यंत तसेच रस्त्याच्या पश्चिम बाजूस १८५, चौधरी असोसिएटस, महात्मा गांधी रस्ता ते महमंद रफी चौक (एसबीआय,एटीएम) पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी वाहनासाठी पार्किंग करण्यात येत आहे. महमंद रफी चौक (एसबीआय, एटीएम) ते कोहीनूर हॉटेल रस्त्याच्या पश्चिम बाजूस २४१, बिल्लीमोरीया कॉस्मेटिक ॲन्ड लेडीज टेलर, कॅम्प या शॉपपर्यंत तसेच पूर्वबाजूस ९३, शमुन्स फ्लॉवर्स, महात्मा गांधी रस्ता, कॅम्प ते ३७, महात्मा गांधी रस्ता, महावीर चौकाजवळील पूर्वबाजूचे बाटा शोरुमपर्यंत व कोहीनूर हॉटेल चौक ते महावीर चौकापर्यत पश्चिम बाजूस २४५/४६, महात्मा गांधी रस्त्यावरील प्रिया हॉटेल ते २८५, डीनोव्हो क्लोथ मार्टपर्यंत सम विषम तारखेस आलटून पालटुन एका बाजूस दुचाकी तर दुसऱ्या बाजुस अॅग्युलर चारचाकी वाहनाचे पार्किंग करण्यात येत आहे.
महावीर चौक ते नाझ चौकापर्यंत पश्चिम बाजूस २९०, कॅन्टाबिल, महात्मा गांधी रस्त्यावरील ६, सारेगामा म्युझिकल शॉपपर्यंत तसेच पूर्व बाजूस ३१/३२, बैंक ऑफ बडोदा ते २७, आदिदास क्लोथ शॉप पर्यंत सम विषम तारखेस आलटून पालटुन एका बाजुस दुचाकी तर दुसऱ्या बाजुस चारचाकी वाहनासाठी ॲग्युलर पार्किंग करण्यात येत आहे. नाझ चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोलेदिना रस्त्यावर रस्त्याच्या पश्चिम बाजूस शॉप नंबर ५, अलाईस इन जॅलेटो लॅन्ड, अरोरा टॉवर बिल्डिंग, कॅम्प ते शॉप नंबर ९ कराची स्वीट मार्ट, अरोरा टॉवर बिल्डिंग, कॅम्प पर्यंत तसेच पूर्व बाजूस शॉप नंबर ११, मॅजेस्टीक परफ्युम अँड अॅपरीयल्स स्टर्लिंग सेंटर बिल्डिंग, कॅम्प ते शॉप नंबर २, बगीचा कॉर्नर पर्यंत दुचाकी वाहनांसाठी पार्किंग करण्यात आले आहे.
वानवडी, मुंढवा व कोरेगाव पार्कमध्ये पार्किंग बदल
वानवडी, मुंढवा व कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदल करण्यात आले आहेत. वानवडी वाहतूक विभागांतर्गत फातिमानगर चौक ते पंचरत्न सोसायटी सोलापूर पुणे रस्त्याची व हॉटेल तंदूर ते फातिमानगर चौक पुणे सोलापूर रस्त्याची बाजू ५० मीटर अंतर नो पार्किंग, नो हॉल्टींग करण्यात आले आहे. तसेच, ॲव्हेन्यु मॉलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून उजव्या व डाव्या बाजूला ५० मीटर नो पार्किंग करण्यात आले आहे. मुंढवा वाहतूक विभागांतर्गत अनंत थिएटर पासून घोरपडी पोलीस चौकीकडे जाणारा रस्ता विश्वलक्ष्मी चौक ते अनंत कॅन्टीन जंक्शनपर्यंत ५०० मीटर पी १, पी २ पार्किंग करण्यात आले आहे. कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत कोरेगाव पार्क लेन क्रमांक ७ रस्त्याच्या पूर्व बाजूस असणाऱ्या क्लोवर रॉयल सोसायटी प्रवेशद्वार (ए) ते क्लोवर पार्क व्यू सोसायटी प्रवेशद्वरापर्यंत एका बाजूला नो पार्किंग करण्यात आले आहे.