पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
पुणे – नाशिक इंडस्ट्रिअल एक्स्प्रेस वें झाला तर ज्या ज्या गावातून हा हायवे जाईल तिथे तिथे शेती माला ची वाहतूक जलद होईल, चाकण खेड भागात अजून मोठ्या प्रमाणात उद्योग धंदे वाढीस लागतील , असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश अगरवाल यांनी व्यक्त केले.
अगरवाल म्हणाले की, मुंबई पुणे जुना रस्ता असताना सुद्धा त्या वेळेच्या दूरदृष्टी असलेल्या राजकीय व्यक्तीनं मुळे व त्या भागातील आमदार, खासदार ह्याच्या विकासासाठी असलेल्या पाठिंब्यामुळे पुणे – मुंबई एक्स्प्रेस हायवे झाला. त्यामुळे पुण्यात प्रचंड प्रमाणात उद्योग धंदे वाढीस आले त्याचा फायदा स्थानिक जागा मालक व पुण्यात काम करणाऱ्या कामगार वर्ग ला झाला आहे. रस्ते जितके वाढतील तितकाच त्या भागाचा विकास होतो. खेड भागातील आंतरराष्ट्रीय विमानतळ हया भागातील पुढाऱ्यांनी घालवले. परंतु आत्ता चे स्थानिक आमदार, खासदार व इतर नेते मंडळींनी पुणे नाशिक इंडस्ट्रिअल एक्स्प्रेस वे चे काम लवकरात लवकर सुरू व्हावे ह्या साठी प्रयत्न करायची गरज आहे.
सरकार आत्ता विकासासाठी जमिनी शेतकऱ्यांकडून घेताना खूप चांगला परतावा व चांगली रक्कम देते त्यांची माहिती नसल्यामुळे व काही स्वार्थी राजकीय व्यक्तींनी दिशाभूल केल्यामुळे शेतकरी जमीन देण्यास विरोध करतात. त्यामुळे त्यामुळे अशे मोठे प्रकल्प मागे पडतात. त्याचा नुकसान येणाऱ्या पिढीला होतो. स्थानिक आमदार खासदारांनी पुणे नाशिक इंडस्ट्रिअल एक्स्प्रेस वे चे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करावे,अशी मागणी देखील अगरवाल यांनी केली आहे.