-व्यवसायाचे पैसे हिसकावले; व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केली
भोसरी 18 नोव्हेंबर: भोसरी मतदारसंघांमध्ये प्रचंड दडपशाही सुरू आहे.महायुती भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी कार्यालयात घुसून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करतो असे म्हणत धाक धपटशा सुरू केला. जबरदस्ती खिशातील व्यवसायाच्या भांडवलाचे पैसे हिसकावले . तुला बघून घेतो असे म्हणत मला धमकावले असे स्वाभिमानी सोलापूर मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.
भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड प्रमाणात दडपशाही सुरू असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे याचा अनुभव महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शनिवारपासून प्रचंड प्रमाणात घेत आहेत.शनिवारी भोसरीतील गव्हाणे वस्ती भागामध्ये दोन कोटी रुपये सापडले असल्याची अफवा महायुतीकडून पसरवण्यात आली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे असेही सांगण्यात आले.यावर तातडीने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.मात्र असा कोणताही प्रकार दिसून आला नाही. यानंतर पत्रकार परिषद घेत महायुतीकडून भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने जे प्रकार होत आहे ते थांबवावे अशी अफवा पसरवणाऱ्या बदनामी करणाऱ्यांना तातडीने निवडणूक विभाग पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली मात्र तरी महायुतीच्या कार्यकर्त्यांची आरेरावी थांबलेली नाही.
रविवारी दुपारी पुन्हा एकदा कुदळवाडी येथे दत्तात्रय जगताप यांच्या कार्यालयात घुसून भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी जगताप यांना अरेरावी केली. त्यांच्यासोबत तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींना धमकावले. जगताप यांच्या खिशातील त्यांच्या व्यवसायाच्या भांडवलाचे पैसे हिसकावून नेले.तसेच या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला. मी पैशाचे वाटप करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल केले. यामुळे आपली प्रचंड मानहानी झाल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील जगताप यांनी केली आहे.