पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
मोशी येथील शाकुंतल ग्रुपच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले आहे. मोशी डूडूळगाव रोडवरील फोरशिया हिल्स या ठिकाणी यावर्षी 500 वृक्षांचे रोपण करण्यात आले. दरम्यान दरवर्षी शाकुंतल ग्रुपच्या वतीने आवर्जून वृक्षारोपण केले जाते. त्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचा आदर्श परिसरात निर्माण झाला आहे.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये 500 वृक्षांचे रोपण करण्यात आले. ज्यामध्ये वड, पिंपळ आणि कडुलिंबाच्या झाडांचा समावेश आहे.
शाकुंतल ग्रुपचे डायरेक्टर अजय विजय म्हणाले, आमच्या ग्रुपच्या वतीने दरवर्षी आवर्जून वृक्षारोपण केले जाते. प्रत्येक प्रोजेक्टच्या ठिकाणी वृक्षारोपणासाठी जागा सोडली जाते. त्यामुळे नागरिकही स्वतःहून वृक्षारोपणामध्ये सहभागी होतात. नागरिकांकडूनही वृक्षारोपण केले जाते यातून पर्यावरण संवर्धनाचा एक संदेश नागरिकांमध्ये रुजवला जात आहे.
डूडूळगाव रोडवरील फोरशिया हिल्स या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अरुण विजय, सतीश गावडे, पुरुषोत्तम आल्हाट, रमेश धायरकर, प्रकाश धायरकर, दीपक धायरकर, आर्ट ऑफ लिविंगचे तुषार आल्हाट उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष गेथे यांनी केले.