पिंपरी-चिंचवडसह शहरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र यांसह मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवार (दि. 22) पासून सुरुवात झाली आहे. बुधवारी आणि गुरुवारी विद्यार्थ्यांना सरावासाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर शुक्रवार (दि. 24) पासून प्रवेश अर्जाचा वैयक्तिक माहितीचा पहिला भाग भरता येणार आहे.

सीबीएसई आणि इतर बोर्डाचे दहावीचे निकाल लागले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल अद्याप बाकी आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर साध्य सहा शहरांमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बुधवार आणि गुरुवार रोजी संकेतस्थळावर डमी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा अर्ज कसा भरावा, त्यात कोणत्या गोष्टी नमूद कराव्यात; याबाबत माहिती या डमी अर्जामधून मिळणार आहे. शुक्रवार (दि. 24) सकाळी 11 पासून वैयक्तिक माहितीचा अर्जाचा भाग दोन भरता येईल. ही प्रक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लागेपर्यंत सुरु राहील. दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून पाच दिवस दुसऱ्या भागातील प्रक्रिया सुरु राहील. त्यामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंतीक्रम देता येईल.

Share

Leave a Reply