-विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ- अजित गव्हाणे
– काकड आरती घेत विठ्ठल मंदिरात नागरिकांशी संवाद
भोसरी 3 नोव्हेंबर: नेहरूनगर, पिंपरी येथील विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्पातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने रविवारी (दि.3) भल्या पहाटेच महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून विठ्ठल नगर पुनर्वसन प्रकल्पातील समस्या आगामी काळात मार्गी लावणार असल्याचे गव्हाणे यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीतर्फे भोसरी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी रविवारी काकड आरतीच्या निमित्ताने नेहरूनगर विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये काकड आरती घेतली. यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांना दिवाळीच्या, महिला भगिनींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला.
माजी विरोधी पक्ष नेते राहुल भोसले यांच्या पुढाकारातून
संभाजी उडापे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तर या कार्यक्रमासाठी हनुमान तरुण मंडळाने संयोजन केले.
यावेळी वीणावादक नाथामहाराज गव्हाणे, बबन शिंदे, मधुकर भसाड, विठ्ठल भसाड, दादा राजगुडे, चंद्रकांत महाराज घोडे , माणिकराव धाडगे, सचिन जाधव, नारायण पांढरे, जयंत शिंदे, संतोष लष्करे, अनिल यादव, किशोर गवई, अशोक बनसोडे, उत्तम जोगदंड, लक्ष्मण
जोगदंड,शिवा उबाळे तसेच नेहरूनगर परिसरातील
ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.
यावेळी राहुल भोसले यांनी अजित गव्हाणे यांना शुभेच्छा देतानाच नेहरूनगर परिसरातील सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. नेहरूनगर भागामध्ये आगामी काळात सुनियोजित व्यवस्थापनाच्या माध्यमातून येथील नागरिकांना सुविधा पुरवायच्या आहेत. त्यासाठी आपल्या विचाराचे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे अजित गव्हाणे यांना सर्वाधिक लीड नेहरूनगर भागातून मिळवून देणार असल्याचा विश्वास भोसले यांनी दिला.
एकजुटीतून परिवर्तन अटळ
गेली दहा वर्ष भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात सर्वच नागरिक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी एकजूट केली आहे. या एकजुटीतून परिवर्तन अटळ आहे असे अजित गव्हाणे म्हणाले. एक विचाराचे सरकार आणल्यानंतर चांगल्या प्रकारच्या सुविधा नागरिकांना मिळतील. गेल्या दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग आता आपल्याला भरून काढायचा आहे असेही गव्हाणे म्हणाले.