पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
मोरे वस्ती,चिखली येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजने शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या स्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून इंग्रजी माध्यमात आर्यन जाधव, तर सेमी इंग्रजी माध्यमात प्रथमेश पोरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
यंदाच्या निकालात अ श्रेणीत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा निर्मला जाधव व सचिव मारुती जाधव, प्राचार्या अश्विनी वाघ यांनी अभिनंदन केले आहे.
इंग्रजी माध्यम निकाल ( प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा व कंसात टक्के)
जाधव आर्यन ज्योतीराम (94.40)
प्रसाद अंजली वीरबहादूर (91.00)
डोंगरे संतुष्टी लक्ष्मण (89.60)
जोगदंड प्रेरणा दिलीप ( 85.60)
मंडल रश्मी किशन कुमार (84.00)
सेमी इंग्रजी माध्यम
पारे प्रथमेश दीपक (81.60)
रायाजी सदानंद सत्यवान ( 80.40)
सुरवसे प्रणव राहुल (78.80)
पवार साक्षी रामचंद्र (76.60)
ढोणे महेश गजानन (72.60)
—————————————
फोटो : चिखली येथील सिद्धीविनायक पब्लिक स्कुलमधील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शाळेच्या अध्यक्षा निर्मला जाधव व प्राचार्या अश्विनी वाघ.
————————